Saturday, December 7, 2024
Homeराज्यरामटेक | रोषणाईने प्रकाशमय झाली विदर्भाची काशी अंबाळा...

रामटेक | रोषणाईने प्रकाशमय झाली विदर्भाची काशी अंबाळा…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – आमदार आशीष जैयस्वाल यानी 5 करोड़ची राशि अंबाला येथील पुरातन मंदिराच्या विद्युत रोशनाई करिता मंजूर केल्याने मंदिरे रोशनाई प्रकाशमय झाली आहेत. प्रभु रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या रामटेक नगरीत अंबाळा तलावाचे महत्त्व अनन्य साधारण आहे.

येथे दररोज हजारो लोक अस्थि विसर्जनच्या निमित्याने येत असतात. सुरू झालेले सौंदरीकरन पर्यटकाच्या मनाला भूरळ पाळत आहे. विशेष बाब ही आहे की अंबाळा येथे विविध मंदिर व छत्र्या धरुण 32 स्मारके आहेत. 33 वे अंबाला तलाव आहे. हे स्मारके व छत्र्या यांची निर्मिती 14 व्या शतकात सुरू झाली. 17 व्या शतकात गोंड राजा व 18 व्या शतकात रघुजी राजे यांच्या काळात सर्वाधिक निर्माण कार्य झाली.

अम्बाला तलाव एक लाख 33 हजार 500 चौरस मिटर मध्ये बांधला आहे. मंदिर वं तलावांच्या सभोवताल पर्वत रांगा आहेत. येथे अंबाला दरवाजा, सुर्य मंदिर, चंद्रमौली मंदिर, हरीहर मंदिर, महादेव मंदिर, पंच शिखरी मंदिर, दत्तमंदिर, दगडी महाल, जगनाथ मंदिर, रेनुका माता मंदिर, भुतलेश्वर मंदिर सहित आदि मंदिर आहेत.

आमदार जैयस्वाल म्हणाले की यापुढेही रामटेक गडमंदिरासह अंबाळा भागात विकास कामे केली जातील.
नागपूर जिल्यातील महत्वपूर्ण स्थळ म्हणून रामटेकचा नावलौकिक आहे. रामटेकला विदर्भाचे काश्मीरही म्हटले जाते. रामटेक गडमंदिरही विद्युत रोशनाई ने प्रकाशमय झालेले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: