पातूर – निशांत गवई
बॉडी बिल्डर्स ॲन्ड फिटनेस असोसिएशन, विदर्भ यांच्या मान्यतेने व बु.गोवर्धनजी पोहरे बहुद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ,पातूर यांच्या वतीने भव्य विदर्भ स्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा भिम श्री-2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे.
पातूर शहरात विठू माऊली लॉन, बोंबटकार यांचा मळा, खानापूर रोड, पातूर ता.पातूर जि. अकोला दिनांक 19/03/2023, रविवारी सायंकाळी 6 : 00 वा. आयोजित केली असून या स्पर्धेत प्रमुख बक्षिसे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स – 31,000 रुपये रोख व ट्रॉफी व सर्टिफिकेट, रनर अप 15,000 रुपये रोख व ट्रॉफी व सर्टिफिकेट असे असून ही स्पर्धा 00- 60 की.ग्रा. , 60- 65 की.ग्रा., 65- 70 की.ग्रा. , 70- 75 की.ग्रा. , 75- 80 की.ग्रा. , 80 किलोच्या वर आशा एकूण सहा वजन गटात घेण्यात येईल.
त्याचप्रमाणे वजन गटातील पहिले बक्षिस 7,000 रुपये ट्रॉफी व सर्टिफिकेट, दुसरे बक्षिस 5,000 रुपये ट्रॉफी व सर्टिफिकेट , तिसरे बक्षिस 3,000 रुपये ट्रॉफी व सर्टिफिकेट, चौथे बक्षिस 2,000 रुपये ट्रॉफी व सर्टिफिकेट, पाचवे बक्षिस 1,000 रुपये ट्रॉफी व सर्टिफिकेट असे राहील असून स्पर्धकांची वजन मापणी दि.19/03/2023 रोजी 12 ते 3:00 वाजतच्या दरम्यान घेतले जाईल.
पातूर शहरात होऊ घातलेल्या या विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 9823933123 , 9552573774 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन स्पर्धेचे आयोजक निर्भय पोहरे(पश्चिम भारत श्री), करण वानखडे सर, स्वप्निल सुरवाडे, प्रविण पोहरे,विकास सदार,धिरज खंडारे,निहार घुगे,अनिकेत पोहरे,राजेंद्र पोहरे,अक्षय पोहरे,प्रविण किरतकार यांनी केले.