नरखेड – अतुल दंढारे
नरखेड येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा परंपरागत बैलपोळ्याचे आयोजन सार्वजनिक बैलपोळा उत्सव समिती व नरखेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
नगर परिषदेच्या प्रांगणात नरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री गवळी साहेब आणि सार्वजनिक बैल पोळा उत्सव समितीचे अध्यक्ष श्री योगेश मांडवेकर यांनी गुडीचे पूजन करून उत्सवाला सुरुवात केली व उपस्थित सर्व पंच आणि मान्यवर यांच्या सह गुढीची मिरवणुक गुजरी बाजारातून बैलपोळा आयोजन स्थळी जुना आठवडी बाजार येथे वाजत – गाजत नेण्यात आली.
गुडीच्या स्वागता करिता रस्त्याच्या दोन्ही बाजूला अफाट जनसागर उपस्थित होता. गुडी बैलपोळा स्थळी पोहचताच पंचांनी उपस्थित बैल जोड्यांमधून उत्कृष्ट पाच बैल जोड्यांची निवड केली. या बैल जोड्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
नरखेडचा हा बैलपोळा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आणि मोठा समजला जातो. या पोळ्या मध्ये यावेळी 300 पेक्षा जास्त बैलजोडींनी सहभाग नोंदविला. पोळा बघण्यासाठी नरखेड व परिसरतील लहान बालगोपालासह, तरुण, वरिष्ठ महिला पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
या दरम्यान रामटेक लोकसभेचे खासदार श्री कृपालजी तुमाने यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री मनोहर गायधने यांच्या बैलजोडीने पहिला क्रमांक, श्री नाझिर पटेल यांच्या जोडीने दुसरा क्रमांक, श्री भागवत रेवतकर यांच्या जोडीने तिसरा क्रमांक, श्री देवरामजी भुक्ते यांच्या जोडीने चोथा तर श्री सुभाष मदनकर यांच्या जोडीने पाचवा क्रमांक पटकाविला.
प्रथम क्रमांकाच्या जोडीला जय किसान इन्टरप्रायजेस, नरखेड तर्फे श्री घनश्यामजी गायधने कडून 5500 ₹,
स्व. वसंतराव देशमुख प्रतिष्ठान तर्फे मान. आमदार श्री अनिल देशमुख यांच्या कडून 3501 ₹
कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड कडून श्री सुरेशजी आरघोडे तर्फे 3000 ₹
टेकाडे मार्केटिंग, नरखेड तर्फे श्री गोपाळजी टेकाडे कडून 2100 ₹
दुसऱ्या क्रमांकाच्या जोडीला स्व. वसंतराव देशमुख प्रतिष्ठान तर्फे मान. आमदार श्री अनिलबाबू देशमुख यांच्या कडून 3001 ₹
श्री अजय बालपांडे, माजी उपाध्यक्ष न. प. नरखेड यांच्या कडून 3001 ₹.
कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड तर्फे श्री सुरेशजी आरघोडे 2500 ₹.
के.जी. एन. ऍग्रो एजन्सी, नरखेड तर्फे श्री शरीफ शेख यांच्या कडून बॅटरी स्प्रे पंप बक्षीस देण्यात आले.
तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीला
स्व. वसंतराव देशमुख प्रतिष्ठान तर्फे मान. आमदार श्री अनिल देशमुख यांच्या कडून 2501 ₹
कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड कडून श्री सुरेशजी आरघोडे 2000 ₹.
शुभम अग्रो एजन्सी, नरखेड कडून 3001 ₹ बी – बियाणे.
चौथ्या क्रमांकाच्या बैलजोडीला
स्व. वसंतराव देशमुख प्रतिष्ठान तर्फे मान. आमदार श्री अनिल देशमुख यांच्या कडून 1501 ₹.
कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड कडून श्री सुरेश आरघोडे 1501 ₹.
मे. खंडेलवाल अग्रो, नरखेड कडून श्री सुदेशजी खुटाटे तर्फे 1500 ₹.
पाचव्या क्रमांकाच्या जोडीला
रिद्धिमा कृषी सेवा केंद्र, नरखेड कडून श्री अविनाश गावंडे व श्री नितीन राऊत यांच्या कडून 3100 ₹ कृषी साहित्य
स्व. वसंतराव देशमुख प्रतिष्ठान तर्फे मान. आमदार श्री अनिल देशमुख यांच्या कडून 1001 ₹.
कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड कडून श्री सुरेशजी आरघोडे तर्फे 1001 ₹ अशी बक्षिसे देण्यात आलीत.
बालपांडे ट्रेडर्स, नरखेड तर्फे श्री कैलास बालपांडे यांच्या कडून पारितोषिक विजेत्या प्रत्येक जोडी मालकाला पेंट चा डबा बक्षीस म्हणून देण्यात आला. यावेळी अमृत गोरक्षण जोडीला सुद्धा प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. श्री संजय चरडे, श्री कैलास बालपांडे, श्री सचिन चरडे, प्रा. नरेश तवले, प्राचार्य श्री कैलास बारमाटे, श्री शरद मदनकर, श्री अजय सोमकुवर व श्री वामनजी चरपे यांच्या कडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. यावर्षी एकूण 53, 250 ₹ बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुरेशजी आरघोडे, माजी न. प. अध्यक्ष श्री संजय चरडे, माजी न. प. उपाध्यक्ष श्री अजय बालपांडे, माजी न. प. अध्यक्ष श्री मनोज कोरडे, श्री जाकीर शेख, श्री सचिन चरडे, श्री श्यामरावजी बारई, श्री राहुल गजबे, श्री संजय कामडे, श्री साहेबराव वघाळे, श्री दिपक ढोमणे , श्री सुदर्शनजी नवघरे, श्री राजूजी जाऊलकर, श्री ज्ञानेश्वर मुलताईकर, श्री अजय सोमकुवर, श्री राजेश क्षीरसागर, श्री भूषण खत्री,
श्री प्रकाशजी झाडे, श्री उमेश कळंबे, श्री योगेंद्र बहद्दुरे, श्री किरण बावनकर, श्री मनोहर गायधने, श्री अनिल गायधने, श्री निखिल पोतदार, श्री पुरुषोत्तम राऊत, प्रा. नरेश तवले, श्री भूषण ढोमणे , श्री शरीफ शेख, श्री कैलास बालपांडे, श्री ज्ञानेश्वर टेकाडे, श्री गोपाल गुजर, श्रीरामजी नवघरे, श्री आकाश जवादे, श्री ईश्वर रेवतकर आदी गण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन नगर परिषद माध्यमिक शाळा क्रमांक 1 चे शिक्षक श्री गुलाबजी काळकर सर व श्री अनिल कावळे सर यांनी केले तर आभार श्री दिनकर लेंभाडे सर यांनी मानले. यावेळेच्या पोळ्याचे आयोजन अगदी वेळेवर केल्या बद्दल उपस्थितांनी आयोजन समितीचे अध्यक्ष श्री योगेश मांडवेकर, आणि संपूर्ण सार्वजनिक बैलपोळा उत्सव समिती, नरखेड व नगर परिषद नरखेड चे आभार मानले.