Monday, December 23, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडीचा विजय - सुधाकर आडबाले हे शिक्षक मतदार संघ नागपूर मधून...

महाविकास आघाडीचा विजय – सुधाकर आडबाले हे शिक्षक मतदार संघ नागपूर मधून विजयी…

आडबाले यांचा एकतर्फी विजय.- नागो गाणार झाले पराभूत…

नरखेड – नागपूर शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नागो गाणार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. महविकास आघाडी तर्फे जागो जागी गुलाल लाऊन, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जलालखेडा येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात गुलाल व पेढे वाटून विजय साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच कैलास निकोसे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अतुल पेठे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य सुधीर खडसे, विनोद घोरमाडे, दीपक गायकवाड, हुरबेग मिर्झा, हरीश सावरकर, मेघराज रामटेके, संजय सौदागर तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

त्याच प्रमाणे भारसिंगी येथील राष्ट्रवादी कार्यालया समोर सुध्दा विजय साजरा करण्यात आला असून यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रवीण जोध, डॉ. संजय ढोकणे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, प्रवीण मोढोरिया, विपीन चापले, सरपंच प्रकाश पोटोडे, उपसरपंच मोहन निंबाळकर, प्रकाश टेकाडे, चिंटू धोटे, संजय पाटील, जगदीश ढोपरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: