रामटेक – राजू कापसे
रामटेक शहरातील मधोमध असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पान संशोधन केंद्राला डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला,अंतर्गत कार्यरत पानवेली संशोधन केंद्र विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. शरद गडाख यांनी नुकतीच दि.९ नोव्हेंबर ला भेट दिली. भेटीदरम्यान कुलगुरुनी पानवेली संशोधन केंद्राची संपूर्ण पाहणी केली.
रामटेक शहरात लोप पावलेली पानवेलीची लागवड पुन्हा वाढवीता येईल या दृष्टीने यथायोग्य प्रयत्न विद्यापीठ करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पानवेली लागवडी ही शेतकर्यांना आर्थीक दृष्ट्या फायदेशीर असल्यामुळे नवीन लागवड तंत्रज्ञान शेतकर्यापर्यंत पोहचवण्यासाठी होतकरु शेतकर्यांना प्रशीक्षण देणे व त्यांना चांगल्या जातीचे बेणे उपलब्ध करुण देवुन रामटेक परिसरात पानवेल लागवड वाढवण्यासाठी संशोधन केंद्र काम करेल असे प्रतिपादन केले.
त्याचप्रमाणे शेतकर्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने संशोधन व संशोधनाचा प्रसार कृषी विभाग मार्फत शेतकर्यांपर्यंत पोहचविला जाईल या दिशेने संशोधन केंद्राचे काम करावे असे निर्देश दिले. सोबतच संशोधन केंद्राच्या जमिनीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी रामटेक चे संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डाॅ.आर.आय. खोब्रागडे यांनी उपस्थित राहुन संपूर्ण माहीती दिली.