खामगाव – विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे दरवर्षी श्री शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी श्री शिवचरित्रावर आधारित ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या वर्षी सुद्धा दि.१९ फेब्रुवारी २०२३ रविवार दिवशी ही ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
खामगाव मधील सर्व शाळांचे विद्यार्थी या प्रश्नोत्तरे स्पर्धेत भाग घेणार आहेत वर्ग ५ते९ व वर्ग १०व११ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होणार असून श्री शिवचरित्र,इतिहास,स्वातंत्र्य चळवळ क्रांतिकारक, संतांचे कार्य यावर प्रश्न राहणार आहेत विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरे स्पर्धेत भाग घ्यावा तसेच मुलांनी श्री शिवाजी महाराजांचा कार्याचा अभ्यास करावा महाराजांनी केलेल्या कार्यातून काही गुण आत्मसात करावे या साठीच या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी विहिंप बजरंग दल कडून करण्यात येते.
रविवार दि १९ फेब्रुवारी २३ सकाळी ७ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर ही स्पर्धा होणार आहे .पालकांनी आपल्या मुलांना वेळेवर मैदानावर घेऊन येणे पहिल्या ३क्रमांकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत असे आवाहन सामान्य न्यान स्पर्धा चे संयोजक विजय जाधव सह संयोजक मैदनकर सर विहीप शहर अध्यक्ष राजेश मुळीक बापुसाहेब करंदीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.