Thursday, September 19, 2024
HomeMarathi News TodayArun Bali | जेष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन…वयाच्या ७९ व्या वर्षी...

Arun Bali | जेष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन…वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

Arun Bali Passes Away : आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले आहे. अरुण बाली यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज (7 ऑक्टोबर) त्यांनी पहाटे 4.30 वाजता जगाचा निरोप घेतला. ते बर्याच दिवसांपासून आजारी होते.

अरुण बाली हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि काही काळापूर्वी त्यांच्या मुलीने सांगितले होते की त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिसचा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या आजारामुळे नसा आणि स्नायू यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. अरुण यांच्या मृत्यूचे कारण काय, याबाबत मात्र ठोस माहिती समोर आलेली नाही. अरुण यांच्या निधनाने सेलेब्स आणि चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत आणि सोशल मीडियावर त्यांची आठवण करत आहेत.

अरुण बाली यांची कारकीर्द
अरुण बाली हे नाव अशा काही स्टार्सपैकी एक होते ज्यांनी आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांची मने जिंकली. अरुण बाली एकीकडे आपल्या भारदस्त आवाजाने व्यक्तिरेखेत जीव आणत असे, तर दुसरीकडे ते आपल्या हसण्याने मन जिंकायचे. कुमकुम, चाणक्य, दूस्या केवल, मर्यादा आणि आरोहन यांसारख्या टीव्ही शोशिवाय अरुण बालीने 3 इडियट्स, पीके, केदारनाथ, जमीन आणि सौगंध यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: