रामटेक – राजु कापसे
वीर जवान अक्षय अशोकराव भिलकर ते बेळगाव (कर्नाटक ) येथे ट्रेनिंग दरम्यान शहीद झाले. अक्षय मिलकर हे राजाजी वार्ड रामटेक जि. नागपूर येथे राहत होते. ०३/११/२०१८ रोजी ते सेनेत भर्ती झाले होते. रविवार सकाळी ९ ते १० च्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटल आणि अक्षय त्यांचा दुर्देवी अपघात झाला.
दुपारी उपचारा दरम्यान ते शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या कुंटुबीयांना कळविण्यात आले. अक्षय चे वय अवघे २७ वर्षाचे होते. त्यांचा कुंटुबात बाबा ,आई व सर्वात मोठ्या तिन बहीन हा लहान एकुलता एक होता. सकाळी त्याचे आपल्या घरच्या लोकांशी फोनवर संभाषन झाले होते. आई बाबा त्याला म्हणत होते की तु केव्हा येणार बेटा.
अक्षय भिलकर ची पोस्टिंग लडाख इथ होती. अक्षय हा ५ वर्षा पूर्वीच अत्यंत कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर सैन्यात भरती झाले. तरुण वयातच सुपुत्र गमावल्याचे दुःखाचे डोंगर त्यांच्या कुंटुबावर व गावावर शोककळा पसरली आहे. नागपूर विमानतळावर विमानाने त्यांचे पार्थिव आणण्यात येईल.
सकाळी त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल व दुपारी २:०० वाजता शासकीय इतममात त्यांच्या पार्थिवावर अंबाळा तिर्थ क्षेत्र रामटेक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.