गणेश तळेकर
निर्माते दिग्दर्शक अभिनेता महेश मांजरेकर यांनी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा मुहूर्त इव्हेंट दमदार केले. शूरवीर मावळे जोरदार नाचले !जे सात वीर सादर केले ते पहाता आपण इतिहासपेक्षा वरचढ सिनेमॅटिक स्वातंत्र्य घेणारा चित्रपट पहाणार असे नक्किच वाटले!
कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती,राज ठाकरे यांचे वेडात वीर दौडले ४० वर केलेले भाष्य आणि मुख्यमंत्र्यांच्या मागेपुढे करणारे कलाकार पहाताना हे नक्की काय व कोणते प्रमोशन चालले आहे ते लक्षात येत होते! त्यातच ऐतिहासिक चित्रपटावर छत्रपतीं संभाजी महाराज यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पहाता याचं काय होणार हा प्रश्न उपस्थित झालाय!
छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का? असा प्रश्नही संभाजी राजे यांनी उपस्थित केला. चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत.
पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? “वेडात मराठे वीर दौडले सात” काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर याचा फोटो दाखवून उपस्थित केला. या चित्रपटात कुठल्या दृष्टीने हा मावळा वाटतो, असंही संभाजी यांनी
दरम्यान इतिहासाचा विपर्यास करणारे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. माझी सूचना आहे की तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट काढायचे आहे तर त्यासाठी ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे, अशी मागणीही संभाजी राजे यांनी केली. इतिहासाचा विपर्यास होऊ देणार नाही. लोकांनी असे चित्रपट बघू नये, अस आवाहन करताना आपण सेन्सॉर बोर्डाला पत्र देणार असल्याचंही संभाजीराजे यांनी म्हटलं. तसेच शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही करू शकतो. अक्षय कुमार असो किंवा दुसरा कुठलाही अभिनेता, असंही ते म्हणाले.
आता प्रश्न आहे तो छत्रपतींच्या वंशजांना मान आणि शिवरायांचा सन्मान किती राखला जातो आणि हे ऐतिहासिक चित्रपटाचं पेव फुटून काहीही मांडण्याचा प्रयत्न होतोय त्यावर नियंत्रण येणार का? आणि हो वेडात मराठे वीर दौडले सात…चित्रपटाचं काय होणार हा प्रश्न ही आहेच!