Sunday, December 22, 2024
HomeBreaking NewsVBA | वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात केले...

VBA | वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात केले दाखल…

VBA : राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.

पुढील 3 ते 5 दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित सोशल मीडिया पेजवरुन ही अधिकृत माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे. राजकारणातील प्रमुख पक्षांनी तिकीट नाकारल्यानंतर अनेक नेते वंचितकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवत असल्याच दिसून आलय. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. 2019 च्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी चांगली मत मिळवली. त्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यामुळेच वंचितची बरीच चर्चा झाली. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला तो करिष्मा करुन दाखवता आला नाही. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि मुख्य चेहरा आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: