कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी ता.निपाणी येथे सुमारे चाळीस लाख रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघ नियमित कोगनोळी या इमारतीचा वास्तू प्रवेश सोहळा मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात माजी ऊर्जा मंत्री विरकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर पीकेपीएस चेअरमन अनिल चौगुले आणि वैशाली चौगुले यांच्या हस्ते विधिवत पुजापाठ करून आरती करण्यात आली.याप्रसंगी माजी जि.पं.उपाध्यक्ष पंकज पाटील,प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील, माजी जि.पं सदस्या अमृता पाटील, कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील, बीडीसीसी बँकेचे उपव्यवस्थापक कलावंत, तालुका नियंत्रक अधिकारी माळिंगे, प्रविण दावणे,
सौंदलगा शाखेचे सर्व सचिव, कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत, जगन्नाथ खोत, केशव पाटील, ज्ञानेश्वर डांगरे, के.डी. पाटील सर, माजी ता. पं.सदस्य बाळासाहेब कागले, ग्रा.पं.सदस्य युवराज कोळी,धनंजय पाटील, तात्यासो कागले, कृष्णात खोत,दिलिप पाटील,संजय पाटील,विश्वजीत लोखंडे,बुद्धीराज घस्ते, यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.