Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsवाशीम । जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात...

वाशीम । जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले…वाशीम ACB ची कारवाई…

वाशीम जिल्हात लाच घेणाऱ्यांचा कर्दनकाळ असणारे ACBचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी आज पुन्हा दबंग कारवाई केली आहे. त्यांच्यासह टीम ने सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. सचिन शिवाजीराव बांगर वय ३९ वर्ष असे लाच घेणाऱ्या अधिकार्याचे नाव असून वाशीम सामान्य रुग्णालयातील वर्ग ३ चे अधिकारी होते. आरोपी विरुद्ध पोस्टे वाशीम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय तक्रारदार यांचे पत्नीचे वैदकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून सही शिक्का घेण्या करिता आलोसे यांनी दि. 05/06/2024 रोजी पडताळणी करवाई दरम्यान 3000/-रु मागणी करून तडजोडी अंती 2500/-रु स्वीकारण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान 2500/-रु पंचासमक्ष स्वीकारले. आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे वाशीम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सक्षम अधिकारी
मा. उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला.

सापळा व तपास अधिकारी*
श्री.गजानन शेळके,
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र.वि. वाशिम.

सापळा कार्यवाही पथक* पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोहवा नितीन टवलारकार, विनोद मार्कंडे,योगेश खोटे, सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम.

मार्गदर्शन
१) मा. श्री.मारूती जगताप, पोलीस अधीक्षक* ,
२) मा. श्री अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

सर्व नागरीकांना आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम पोलीस उप अधीक्षक
*@दुरध्वनी क्रं – 07252 235933
*@टोल फ्रि क्रं 1064*

  • मोबाईल क्र. 9423338424
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: