पातुर – निशांत गवई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचा वर्ग दहावीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय पातूरचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयाने सतत चालत आलेली आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे.
वसंतराव नाईक विद्यालयामधून एकूण ४५ विद्यार्थी वर्ग दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यामधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत,विद्यालयातून एकूण २६ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण झाले असून १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ०२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या विद्यालयातून कु. सृष्टी विजयसिंह राठोड हिने ९४.४० % गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला, तर कु. श्रुती विजय कांबळे हिने ९४.२० % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कु. कोमल रामदास इंगळे हिने ९४.००% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला, तसेच कु.साक्षी अमर वानखडे ९२.४० %, निखिल ज्ञानेश्वर मोकळकार ८९.६० %, सुमित वासुदेव गाडगे ८८.८० %,कु. तनुश्री संजय राठोड ८७.४० % , कु. तनिष्का संजय तायडे ८५.८० % , कु. अंकिता शिवाजी भराडे ८५.४०,
ऋतिक सुभाष राठोड ८५.२०% , कु. आचल दिलीप बोचरे ८४.००% , कु.हर्षा शुद्धोधन करवते ८२.६० % , जयेंद्र गजानन सोनुणे ८२.४०%. विद्यालयाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक/ सचिव मा. श्री रामसिंगजी जाधव साहेब व प्राचार्य श्री.एस.एम.सौंदळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.