Monday, December 23, 2024
Homeराज्यवसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूरचा शंभर टक्के निकाल…

वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूरचा शंभर टक्के निकाल…

गत १२ वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…

पातुर – निशांत गवई

नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचा वर्ग बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूरचा १०० टक्के निकाल लागला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाने गत बारा वर्षापासून चालत आलेली आपली शंभर टक्के निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे.

वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मधून एकूण ८१ विद्यार्थी विज्ञान शाखेत परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यामधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत,महाविद्यालयातून एकूण २८ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण झाले असून ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ०५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

या कनिष्ठ महाविद्यालयातून यश वैराळे याने ८७.६७% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तर कु. भावना सावंत हिने ८७.००% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कु. दिव्या गोळे हिने ८६.३३ % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला, तसेच हितेश्वर तायडे ८५.५०%, कु.अश्विनी पाटील ८५.१७%,

कु.साक्षी राठोड ८४.८३%, गौरव काळे ८४.६७ % , कु.प्रेरणा जामोदे ८४.६७% , कु. मोहिनी निकोले ८३.३३% , प्रतीक बंड ८२.५०% , कु.पायल वानखडे ८१.८३% , कु.श्रेया आवटे ८१.५०% ,कु. तेजस्विनी बावणे ८१.००% , शुभम वाघ ८०.५० % ,कु.आरती उंबरकर ८०.१७ % आदी विद्यार्थी ८० टक्केच्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले.

महाविद्यालयाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक/ सचिव मा. श्री रामसिंगजी जाधव साहेब व प्राचार्य श्री.एस.एम.सौंदळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: