Friday, October 25, 2024
Homeराज्यसांगली | १३६ व्या कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमाचे...

सांगली | १३६ व्या कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन…

सांगली – ज्योती मोरे

सांगली – स्मरण कर्मवीरांचे अखंड वंदन प्रेरणादायी स्मृतीचे, आपल्या कर्मयोगातून पुढच्या अनेक पिढ्या घडविणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव अण्णा यांच्या जयंतीनिमित्त सांगली इथे,कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह पतसंस्था मर्या सांगली यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक 22 9 2023 रोजी दुपारी ठीक तीन वाजता भावे नाट्यमंदिर सांगली येथे व कर्मवीर पतसंस्था मुख्य कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री संजय आवटी प्रसिद्ध लेखक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त माननीय श्री सुनील पवार या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री रावसाहेब जीनगोंडा पाटील चेअरमन कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह पतसंस्था मर्या सांगली तसेच संस्थेचे संचालक माननीय श्री अनिल श्रीपाल मगदूम डॉक्टर अशोक अण्णा सगळे श्री लालासो अण्णासो थोटे श्री एके चौगुले नाना आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: