Monday, December 23, 2024
Homeराज्यसांगली शहरात व्हॅलेन्टाईन डे निमित्त विविध उपक्रम...

सांगली शहरात व्हॅलेन्टाईन डे निमित्त विविध उपक्रम…

रोटी डे साजरा : हुतात्म्यांना अभिवादन : फुले, गिफ्ट, कॉफी शॉपमध्ये तरुणाईची गर्दी, चित्रपटगृहे फुल्ल…

सांगली – ज्योती मोरे

शहरात मंगळवारी व्हॅलेन्टाईन डे उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने यंदाही शहरात विविध सामाजिक उपक्रम पार पडले. काही मंडळांनी शहिदांना स्मरण करत गुलाब पुष्म वाहिले,तर काहींनी गोरगरीब बांधवांना माजी भाकरी व गुलाब पुष्प देत,व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. शहरातील तरुणाईने व्हॅलेन्टाईन डे निमित्त तरुण वर्गाकडून गेले सप्ताहभर रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, असे विविध दिन साजरे करण्यात आले.

राममंदिर चौक येथे फुलांच्या
दुकानाजवळ सेल्टी पॉईंट उभारण्यात आला होता. यावेळी दिवसभर अनेक जोडपी आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी टिपण्यात दंग असलेली दिसून आली. फुलांच्या दुकानांमध्ये साधा गुलाब ३० रुपये, कलर गुलाब ३५, बुके १५० ते ५०००, हार्ट शेप बुके २५०० ते ३५००, चॉकलेट बुके १२०० ते ४०००, आय लव्ह यु शेप बुके २५०० ते ४०००, हार्ट शेप बुके ५०० ते २००० व फुलांची टोकरी ३५० ते ३००० रुपये असे विविध दर उपलब्ध होते.

Valentine’s Day in Sangli city

याशिवाय गिफ्ट सेंटरमध्येही मोठी गर्दी दिसून आली. येथे विविध भेटवस्तू, चॉकलेट्स यांची खरेदीविक्री जोरात झाल्याची माहिती गिफ्ट विक्रेत्यांनी दिली. फ्यूजन अकॅडमी व नटराज फौंडेशन यांच्यावतीने मंगळवारी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रोटी डे साजरा करण्यात आला. या ग्रुपतर्फे शहरातील बेघर, भिकारी, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना भाजी-भाकरी व प्रेमाचं प्रतिक म्हणून गुलाब देऊन हा प्रेमदिन साजरा करण्यात आला.

उपक्रमाचे हे नववे वर्ष होते.

मंगळवारी सकाळी प्रत्येकाने घरातून आणलेली पोळी भाजी गणपती मंदिरासह विविध भागातील गरजूंना दिली. तसेच प्रेमाचे प्रतिक म्हणून हे गुलाबाचे फुलही दिले. यावेळी सूरज
वाघमोडे, कुलभूषण काटे, यश पवार, वैभव चव्हाण, चेतना खूळ, सचिन ठाणेकर आदी उपस्थित होते.

मित्र मंडळ ग्रुपतर्फे शहिदांचा व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यात आला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या शहिदांना एक फूल वाहून त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यात आली. तसेच या ठिकाणी देशभक्ती पर गाण्यांचाही उपक्रमही राबविण्यात आला. उपक्रमाचे हे १२ वे वर्ष होते. यावेळी दिपक चव्हाण यांनी देशभक्तीवरील गीते म्हणून शहिदांना आदरांजली वाहिली. तसेच नागरिकांनीही एक गुलाब पुष्प शहिदांना वाहत त्यांचे स्मरण केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: