न्युज डेस्क – आपली मातृभाषा मराठी जशी वळणा-वळणावर बदलते, तसं आपल्या राज्याच्या खाद्यसंस्कृतीतही वैविध्य आढळतं. वडापाव, भाकरी अन् ठेचा हे तर सर्वांच्याच आवडीचे पदार्थ. मात्र यासह महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ मोठ्या चवीनं खाल्ले जातात. विदर्भातिल वांग्याची भाजी आणि बिट्ट्याचा बेत म्हणजे जणू तृप्तीचा ढेकर. असं म्हणतात की, विदर्भातिल वांग्याची भाजी आणि बिट्ट्या एकदा खाल्ली की, पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. इथं अनेक घरांमध्ये दर आठवड्याला हा बेत असतो. शिवाय ठिकठिकाणी या पदार्थांची विक्री होते आणि मोठी मागणी मिळते.
आज आपण असा एक व्हायरल व्हिडिओ पाहणार आहोत, या व्हिडिओमध्ये मुले विदर्भातिल सर्वात भारी वांग्याची भाजी आणि बिट्ट्या बनवत आहेत आणि मजा करत आणि नाचत आहेत. पार्श्वभूमीत मराठी संगीत वाजत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अभिजीत बोपटे नावाच्या एका युजरने बनवला आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 15 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर 25 हजारों लोकांनी त्याला लाईक आणि 23 हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं आहे. व्हिडिओवर अनेक टिप्पणी देखील आल्या आहेत.
फ़ूड लवर निकी यांनी लिहिलं की, “विदर्भातील मानाची भाजी वांग्याची भाजी…प्रत्येक पंगतीत वांग्याच्या भाजीला मान असतोच….”कोमल मराठा यांनी लिहिलं की, “बाबा तुझा तोंडाला पाणी सोडलं.” बोबडे कल्याणी यांनी टिप्पणी केली, “पाहूनच तोंडाला पाणी सुटलं” या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.