सांगली – ज्योती मोरे
मिरज मार्केट परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील मूर्तीची तोडफोड केल्याने मिरजेतील वातावरण चांगलेच तापले होते.तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता.अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मिरजेत दोषीवर कारवाई करण्यात यावी.
यासाठी मिरज बंद करत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. दरम्यान उद्या दिनांक 20 एप्रिल रोजी बंद पुकारण्यात आला होता. परंतु पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावून तत्परतेने तपास करत, एका जया आवळे नामक माथेफिरू महिलेस ताब्यात घेतल्याने, तिनेच हे कृत्य केल्याचे सिद्ध केल्याने उद्याचा बंद मागे घेण्यात आला आहे.
दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईणकर यांनी संबंधित आरोपी महिलेस अटक करण्यात आल्याने,उद्याचा बंद रद्द करण्यात आल्याचे म्हटले. तर सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांनी शांतता पाळावी. असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले.