मूर्तिजापूर विधानसभेच्या मतदार संघात भावी उमेदवारांचा सुळसुळाट दिसून येत असून तर महाविकास आघाडीच्या एका पक्षासह कोणत्याही पक्षाशी घेणेदेणे नसलेल्या काही भावी उमेदवारांनी कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे तर नागरिकही या कार्यक्रमाचा चांगलाच लाभ घेत आहे. अश्यातच सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे ते वंचित कडून कोण उमेदवार असणार?. मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वंचितने राज्यातील ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे. मात्र वंचितचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवारी केव्हा जाहीर होणार याकडे सर्व सामन्यांचे लक्ष लागले आहे.
मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या वंचितला यावेळी चांगली संधी चालून आली आहे. मूर्तिजापूर विधानसभेत भाजप आमदाराचा होत असलेला विरोध पाहता वंचितकडून यावेळी योग्य उमेदवार मिळाला तर यावेळेस नक्कीच मूर्तिजापूर विधानसभेत वंचितचा आमदार असणार आहे असे राजकीय तज्ञाचे मत आहे. तर वंचित कडून कोणाला उमेदवारी मिळाली तर निवडून येण्याची शक्यता आहे?. अशा उमेदवाराबद्दल आपण जाणून घेऊया.
गेल्या तीन टर्म पासून दुसऱ्या नंबर राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला यावेळी मूर्तिजापूर विधानसभेत विजय संपादन करण्याची चांगली संधी चालून येत आहे. तर वंचित यावेळी कोणता उमेदवार देणार आहे. यावरच जनतेच लक्ष लागून आहे. मागील निवडणुकीत जात, धर्म बाजूला ठेवून वंचितच्या उमेदवाराला मोठी लीड दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होणार काय?. या मतदार संघात आता जातीपातीचे राजकारण चालणार नसल्याचे राजकीय तज्ञ सांगतात. जातीपातीच्या राजकारणामुळे मतदार संघाच काय नुकसान झालं ते जनतेला ठावूक आहे. जनता अश्या जातीपातीच्या राजकारणाला कंटाळून गेली असल्याने, यावेळी योग्य उमेदवारालाच निवडणून देतील, जर या मतदार संघात जातीयवाद असता तर वंचित च्या उमेदवाराला एवढी लीड मिळाली असती का? असे राजकीय तज्ञ सांगतात.
उमेदवारी कोणाला मिळणार हे सध्या तरी स्पष्ट नसलं तरी मूर्तिजापूर शहरातील स्थानिक उमेदवार द्यावा अशी स्थानिकांची इच्छा आहे. मात्र बाळासाहेब आंबेडकर काय निर्णय घेतात यावर अवलंबून आहे. कारण त्यांचा कोणी गुरु नाही आणि कोणी चेला नसल्याने त्यांच्या मनात जो उमेदवार असेल त्यालाच येथे संधी देणार असल्याचे समजते. यासाठी बाळासाहेबांची टीम काम करीत आहे. या निवडणुकीत वंचितला इतर समाजातील मते घेणारा उमेदवार हवाय, मग तो पैसेवाला असो किंवा सामान्य असो. अश्याच उमेदवाराला बाळासाहेब तिकीट देण्यार असल्याचे समजते. मागील निवडणुकीत मोठा अटीतटीचा सामना करून दुसऱ्या नंबर राहिलेल्या वंचितच्या प्रतिभाताई अवचार यांना पुन्हा वंचित संधी देवू शकते. तर कार्यकर्त्यांच्या मते जर विचार केला तर शहरातील स्थानिक उमेदवार सुद्धा असू शकतो. उमेदवाराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार फक्त बाळासाहेबांच असल्याने कोणी कितीही सांगितले की मीच उमेदवार आहे यावर कोणीही विस्वास ठेवू नका असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले होते.
वंचितला या मतदार संघात निवडून येण्यासाठी दहा ते पंधरा हजार मतांची आवश्यकता आहे. ज्यांची ताकद मतदार संघात इतर जातीच्या लोकांना जवळ करून त्याचं मतदान घेण्याची असेल अश्याच उमेदवाराचा येथे संधी मिळणार आहे. ताकद हि केवळ पैश्याची नव्हे तर लोकांना आपल करण्याची…
शहरातील जनतेला त्यांच्या समस्या मार्गी लावणारा त्यांच्यातील एक लोकप्रतिनिधी हवा आहे. तर वंचित यावेळी कोणाला संधी देणार स्थानिक नेत्याला की मागील निवडणुकीत ज्यांनी तगडी टक्कर दिली होती त्याला, जर वंचितने नवख्या उमेदवाराला मतदारसंघात संधी दिली तर वंचित हा तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता राजकीय तज्ञ लावत आहे तर वंचित यावेळी स्थानिक किंवा ओळखीचा चेहरा या मतदारसंघाला देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे…