डॉ.बाबासाहेबा आंबेडकरांबद्ल विलास मुत्तेमवार यांचे अपमानजनक उदगार !
नागपुर – शरद नागदेवे
नागपुर – वाडी(प्र) : गुरुवारी नागपूर येथे काँग्रेस च्या आढावा बैठकीत कांग्रेस नेते,माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी बहुजनांचे उद्धारकर्ते व संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात पत्रकारांसमोर वक्तव्य देताना बाबासाहेबांचा अपमान होईल असे वक्तव्य दिले.हि बाब उघड होताच फुले,शाहू,आंबेडकरी समाजात व त्यांच्या अनुयायात प्रचंड रोष निर्माण झाला.
विलास मुत्तेमवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी व त्यांनी जाहीर माफी मागावी यासाठी शनिवारला शंकर नगर येथील त्यांच्या निवास स्थानासमोर वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे व दिलेल्या अधिकारामुळेच विलास मुत्तेमवार हे खासदार म्हणून मंत्री पदा पर्यंत पोहोचले.
त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास माहीत असतानाही त्यांनी अशा पद्धतीचे अपमान जनक वक्तव्य करणे हे त्यांना शोभणारे नाही.यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र आक्रोश निर्माण झाला असल्याचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांनी सांगितले.
निषेध आंदोलनात वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष रवी शेंडे,माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,युवा आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर,माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे सह सुमित गोंडाने, अतुल शेंडे,राहुल दहीकर,अंकुश मोहिले,यश कुंभारे,संजय सूर्यवंशी,प्रतिमा शेंडे,रिता जामगडे,सुनील रामटेके,
राजेश रंगारी,प्रदीप गणवीर,रोहित धोंगडे,धर्मेश फुसाटे,राहुल दहीकर, प्रवीण पाटील, विजय गोंडुळे,रमेश कांबळे,नितीन वाघमोडे,प्रवीण तायडे,जितेंद्र पानतावणे इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.