Vanchit Bahujan Aaghadi : मराठवाड्यातील मराठ्यांनी बीड मधून लोकसभा लढवावी या मागणी नंतर राज्यातील अनेक ठिकाणांहून बाळासाहेबांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. कारण अकोल्यात सर्व वंचित समाजघटकांना आंबेडकरांनी सत्तेची सुत्रे दिली. राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाला हे जमले नाही. सध्या राज्यात जनते ऐवजी नेत्यांच्या पुनर्वसन आणि विकासासाठी कसा नंगानाच चाललाय आहे हे राज्यातील जनता उघडया डोळ्यांनी बघत आहे. या विकासहीन राजकारणाला कंटाळून येथील जनता पर्याय शोधत आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी ज्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर प्रश्न मांडत आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील भारताच्या निर्मिती साठी कार्यरत असल्यामुळे बाळासाहेबांची लोकप्रियताच नव्हे तर कल वाढत आहे.
मागील आठवड्यात अमरावतीत झालेल्या वंचितच्या महासभेने येथील राजकीय प्रस्थापित नेत्यांची झोप उडवून टाकली, लोकशाही गौरव महासभेला जमलेला प्रचंड जनसमुदाय याची ग्वाही देतो, यासभेमुळे येथील राजकीय गणित आता बिघडणार असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.
अमरावती मध्ये झालेल्या सभेला लक्षावधी लोकांनी हजेरी लावून बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितांच्या लढ्याला जोरदार समर्थन दिले आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक दशकापासून अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब शोषित पीडित वंचित समाजातील सर्व घटकातील सर्वांना ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा स्तरावर संधी दिली आहे. त्यामुळे सामाजिक विषमता दूर होण्यास मोठी मदत झाली आहे, त्याबरोबरच सत्तेचे सूत्र वंचितांकडे आल्यामुळे त्यांच्या मूलभूत विकासासाठी हातभार लागला आहे. तर अमरावती जिल्ह्यातही अकोला पॅटर्न ची घोडदौड सुरू झाली आहे. येथील सामान्य जनता अकोला पैटर्न आणि बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व अग्रक्रमाने स्विकारत आहे.वंचितांना हक्काचा पर्याय मिळाला आहे.