अकोला – संतोषकुमार गवई
अकोला महानगर पालिकेत सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या पेन्शन मध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असून या घोट्याळ्यातील दोषी अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी वाल्मिक सेना मनपा समोर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती वाल्मिक सेनेचे अध्यक्ष राहुल सारवान यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत या आर्थिक घोट्याळयाची माहिती देण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे,अमर डीकाव,विजय गोडाले, लखन सारवान, संतोष झंझोटे,दीपक धंजे,जय तंबोली,रवी धंजे आदी उपस्थित होते.या संदर्भात अनेक तक्रारीच्या आधारे मनपा प्रशासनाने चौकशी गठीत केली होती.
या चौकशीत दोन वर्षात करोडो रुपयाचा घोटाळा पेंशन लिपिक अशोक सोळंखे यानी करून मृत पावलेल्या सफाई कामगारांच्या पेन्शनची अफरातफर केल्याचे आढळून आले होते. मात्र मनपातील या घोटाळ्याचा लाभ घेतलेल्या काही अधिकाऱ्यांनी ही चौकशी दाबून घोट्याळयाचा सूत्रधार अशोक सोळंके यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. हा पेन्शन निधी परस्पर काढण्याचा प्रकार गत पंधरा वर्षापासून होत असून ही बाब मनपा प्रशासनाला माहीत झाली नाही.सोळंके कर्मचाऱ्यांला सोळंखे व्याजाने पैसे देऊन त्याबदल्यात त्याचे एटीएम,चेकबुक. बँकेचे पासबुक व नंतर त्याच्या खात्यात पेन्शन चे पैसे ट्रान्सफर करायचे.
सोळंके यांच्या जवळ एटीएम असल्यामुळें काही अधिकाऱ्यांच्या साहाय्याने ते पैसे काढायचे.असेही यावेळी सांगण्यात आले?सबब या सर्व चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली या आर्थिक घोट्याळयातुन अशोक सोळंके यांनी अनेक कोटी रुपयांची मालमत्ता जमविली असून या संदर्भात ही अनेक तक्रारी सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांनी केल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रशासनाने या मनपातील घोट्याळयाची चौकशी करून यातील मुख्य आरोपी अशोक सोळंके यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा वाल्मिक सेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी अभिजित तंवर,विशाल चावरे,विक्की भारोटे, चेतन थामेल, जय निधाने समवेत वाल्मिक सेनेचे पदाधिकारी व सेवानिवृत्त सफाई कर्मचारी उपस्थित होते.