गांधीनगर – राजेद्र ढाले
गांधीनगर व्यापार पेठेमध्ये वळीवडे कॉर्नर ते चिंचवाड ट्रान्सपोर्ट लाईन रोडवर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनानी वाहतुकीची कोंडी होत आहे. चिंचवाड, गडमुडशिंगी, वसगडे इथून येणाऱ्या रूग्णवाहिकेस अन्य वाहनांना त्याचा त्रास होत आहे. या नित्याच्या डोकेदुखीवर उपाययोजना होणार तरी कधी गांधीनगर बाजारपेठेत असंख्य वाहने ये-जा करत असतात.
बाजारपेठेचा वाढता व्याप व वाढती ग्राहकांची संख्या पाहता प्रशासनाने शासनाकडे या रस्त्याच्या रूंदीकरणासह नव्याने रस्ता करण्यासाठी पाठपुरावा केला रस्त्याची रूंदी वाढवून १० कोटीवर रूपये खर्च करून हा रस्ता नविन करण्यात आला. त्यानंतर येथील वाहतुक व्यवस्था सुरळीत होईल अशी सर्वांची अपेक्षा होती पण तसेच चित्र पुढे आले नाही. उलट पक्षी रस्त्याच्या रूंदीकरणाचा दुरूपयोग होऊ लागला उभी आडवी वाहने कशीही उभी राहु लागली शिस्त नसल्याने कोणीही कोठेही वाहन पार्किंग करत आहे त्यामुळे वाहतुकीला अडसर होत आहे.
उभ्या आडव्या लावलेल्या माल ट्रक, टॅम्पो अशा अवजड वाहनांनी संपुर्ण रस्ता व्यापला जात आहे या रस्त्यावरून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या कोंडीतुन मार्गक्रमन करणे एक मोठे संकटच ठरत आहे. दुचाकी वाहनांनातर कोणत्या बाजुने वाहन चालवायचे असा वारंवार प्रश्न पडत आहे. या रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीमुळे वळीवडे येथील माजी सरपंचचांचा अपघाती मृत्यु झाला आहे दुचाकीने ठोकरल्याने एक वृध्द महिलेच्या डोक्याला गंभीर मार बसला उपचार करून ही वृध्द महिला वाचू शकली नाही.
अपघाताच्या अशा वारंवार घटना होत असल्याने शासनाने व प्रशासने प्रयत्न करून रूंदीकरणासह नविन रस्त्यासाठी निधी मंजूर केला.या पाठपुराव्या नंतर नव्याने रस्ता करण्यात आला रूंदीकरणासह रस्ता नव्याने झाल्याने वास्तविक वाहतुकीची कोंडी होणार नाही अशी आम जनतेची अपेक्षा होती. पण आज या रस्त्यावर कशीही उभी राहिलेली वाहने पाहून जनतेची अपेक्षा निष्फळ ठरली.
गांधीनगर पोलीसांचा राबता येथे कायम आहे. तरी सुध्दा वाहतुकीला शिस्त का लागत नाही. वाहतुकीची कोंडी का होते. वाहन धारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत का करावी लागते. रूग्ण वाहिकांना वाट का मिळत नाही. रोज छोटे-मोठे अपघात का होतात? या बाबत संबंधीत यंत्रणेने आत्मपरिक्षण करून उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. तसे झाले नाहीतर अनेक दुदैवी घटनांना सामोरे जावे लागले आहे.
याबाबत ताबडतोब उपययोजना करावी अन्यथा (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) करवीर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल.असा इशारा शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला.
या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मा. श्रीमती प्रिया.ना.पाटील, पोलीस उपअधीक्षक(गृह) कोल्हापूर यांना देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी गांधीनगर पोलिसांना याबाबत सूचना देऊन लवकरात लवकर वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवू व कायमस्वरूपी वाहतूक सुरळीत व शिस्तबद्ध होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करू असे आश्वासन दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, विभागप्रमुख दिपक फ्रेमवाला, विभागप्रमुख विरेंद्र भोपळे, ग्राहक सेना ता. प्रमुख जितेंद्र कुबडे, शाखा प्रमुख दिपक पोपटाणी, उपशाखाप्रमुख सुनिल पारपाणी, अजित चव्हाण आदी उपस्थित होते