अभ्युदय फाउंडेशन देणार सेवा
पातूर – निशांत गवई
पातूरवासियांना अंत्ययात्रेसाठी वैकुंठ रथाची गरज लक्षात घेता वैकुंठ रथ सेवार्थ अर्पण करण्यात आला आहे. आता पातूरवासियांना वैकुंठ रथाची सेवा मिळणार आहे.
पातूरवासियांना अंत्यविधी साठी चार ते पाच किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो. यावेळी खान्देकरी यांना होणारा त्रास लक्षात घेता अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने वैकुंठ रथ उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत पातूर येथील बनसोड परिवाराने पुढाकार घेत वैकुंठ रथ अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला समर्पित केला.
स्व. दत्तात्रय त्र्यंबकराव बनसोड व स्व. प्रभाकरराव त्र्यंबकराव बनसोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा वैकुंठ रथ जनहितार्थ अभ्युदय फाउंडेशनला समर्पित केला आहे. बनसोड परिवारातील लक्ष्मीकांत बनसोड, उमाकांत बनसोड, रजनीकांत बनसोड, स्मिताताई चंद्रकांत बनसोड, उज्वलाताई बनसोड आदींनी या वैकुंठ रथ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. बनसोड परिवाराने हा वैकुंठ रथ अभ्युदय फाउंडेशन चे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटीभाऊ गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रविण निलखन, दिलीपभाऊ निमकंडे, प्रशांत बंड आदीच्या उपस्थितीत अर्पण केला. यावेळी दादासाहेब सरनाईक, विनोद देशपांडे, कल्पनाताई व्यवहारे, संकल्प व्यवहारे उपस्थित होते. संचालन गोपाल गाडगे यांनी तर आभार बंटीभाऊ गहिलोत यांनी मानले.
अभ्युदय फाउंडेशन देणार सेवा
पातूरवासियांना ही सेवा लागल्यास अत्यल्प दारात ही सेवा अभ्युदय फाउंडेशन देणार आहे. अधिक माहितीसाठी 8554998284 व 9096896645 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अभ्युदय फाउंडेशनने केले आहे.