Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनवैदर्भीय सिनेस्वप्नांचे कोंदण - कॉटनसिटी फिल्म फेस्टिवल... 

वैदर्भीय सिनेस्वप्नांचे कोंदण – कॉटनसिटी फिल्म फेस्टिवल… 

स्वप्न माणसाला जगण्याची उमेद देतात. काही ध्येयवेडी माणसं स्वतः सोबतच इतरांची स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचं रान करत असतात. आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रवासाची वेगळीच पायवाट निवडतात.  सिनेविश्व खरं तर ग्लॅमरस आणि भुलभुलय्या असणारे क्षेत्र. मुंबई पुण्यात सिनेक्षेत्रात सतत घडामोडी घडत असतात.

त्यात विदर्भाच्या उपेक्षित आणि ओसाड माळरानावर चित्रपट निर्मितीचा अंकुर फुलवला एका ध्येयवेड्या अवलीयाने. प्रशांत मानकर. मराठी चित्रपट सृष्टीच्या क्षितिजवरील आश्वासक  नाव.निर्मिती क्षेत्रात उत्तुंग झेप घेऊन जमिनीशी घट्ट नाळ जोडलेला सिनेकर्मी. पुणे, मुंबई आणि कॉर्पोरेट मधली सिनेसृष्टी तळागाळात पोचवण्याचं ध्येय घेऊन अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला या क्षेत्रात आणण्यासाठी धडपडणारा निर्माता.

आणि विदर्भाला लाभलेला एक सुजाण आणि चिकित्सक रसिक. पारस सारख्या ग्रामीण भागातून पथनाट्य, नाटक ते सीने सृष्टीतील निर्माता हा प्रशांत मानकरांचा प्रवास थक्क करणारा आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीत आपल्याला आणि विदर्भाला कोणीही गॉडफादर नाही हे खंत त्यांना कायम बोचत असे. आणि ह्यातूनच सुरू झाली एक सिने विश्वातील चळवळ. कॉटनसिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. 

कॉटनसिटी फिल्म फेस्टिवल म्हणजे केवळ केवळ चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि पुरस्कार नव्हे तर एक सिनेकर्मिंची एक चळवळ आहे. सिनेमा हा आपल्या अभिव्यक्तीचे एक सशक्त मध्यम आहे. त्याला सर्वसमावेशक बनवताना तळागाळातील माणूस चित्रपटाशी कसा जोडला जाईल, ह्याचे माध्यम प्रशांत मानकर यांनी केले आहे.

साहित्य, कला, सामाजिक, प्रशासकीय समूह चित्रपट सृष्टीशी जोडला आहे.विदर्भाच्या मातीत चित्रपट संस्कृती रुजवण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत.कित्येक नवोदितांना फिल्मच्या सगळ्या विविध तांत्रिक क्षेत्रात मानकरांनी तयार केले आहेत. आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. मागील आठवड्यात या फिल्म फेस्टिवलच्या मुंबईतील दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार होता आले. आणि मानकरांच्या कार्यक्षेत्राचा परीघ लक्षात आला.

सिनेसृष्टीतील दिग्गजांची मांदियाळी ते ऑस्कर सारख्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारातील जुरी मेंबर, पद्मश्री आणि त्यांच्या जोडीला विदर्भाच्या मातीतील सिनेसृष्टीत काम करणाऱ्या लोकांचा गौरव ही विदर्भाच्या सिने सृष्टीतील भविष्यासाठी आश्वासक वाटते. मानकरांचा हा प्रवास काही सोपा नाही.

अगदी नाट्यप्रवासापासून सुरु झालेला प्रवास त्यांनी एक निर्मितीचे शिवधनुष्य पेलले.२००७ साली त्यांनी निर्मित केलेला पहिला चित्रपट, ‘पूर्णविराम’.त्यात अकोल्याचे तेव्हाचे श्रीकर परदेशी, पुण्यातील चंद्रकांत दळवी मार्गदर्शक आणि आर. आर. पाटील ह्यांच्या मार्गदर्शनात रवी पटवर्धन यांना घेऊन पहिला चित्रपट यशस्वी केला.

त्यानंतर एक पहिले व्यावसायिक नाटक, घडलं ते बिघडलंय’ हे निर्मित केले.आणि घडलं बिघडलं चे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग केलेत.त्यानंतर छाया कदम, मिलिंद शिंदे सारख्या दिग्गज कलाकारांना घेऊन ‘शिरपा’ नावाचाचित्रपट केला.त्यानंतर ‘टिंबटिंब नावाचा चित्रपट केला. काही कारणास्तव तो येऊ शकला नाही.

आणि आता ‘बिल्लोरी’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तर आगामी चित्रपट‘जिव्हार’ जर्नी टू काश्मीर’ आणि ‘लंगडी – द गेम’ चित्रीकरण होण्याच्या मार्गावर आहेत. ह्या सगळ्या प्रवासात तळागाळातील नवोदित कलाकारांना संधी देण्याचे काम प्रशांत मानकर यांनी केलेले आहे.पण मुक्या प्रवाहातील सेलिब्रिटी त्यांना जोडत गेलेत.हरिहरन, साधना सरगम,प्रेम किरण सारख्या दिग्गज मंडळींनी कॉटनसिटीचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला आहे.

आणि ह्यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे लाडके ज्यांना अतिशय आदराने ‘मामा’ म्हणतात ते अशोक सराफ ह्यांना देऊन गौरवले आहे.त्याच सोबत पद्मश्री बजाज यांना जीवनगौरव देऊन सन्मानित केले आहे.

पण पारस सारख्या छोट्या गावातून येऊन मुंबईतील अफाट अश्या चित्रपट श्रुष्टीत स्वतःचे अस्तित्व निर्माण करत असताना त्यांना कित्येकांची साथ लाभली.कित्येक सोहळे आयोजित केलेत. पुरेशी स्पोंसरशिप नसताना स्वतःच्या कमाईतील वाटा ह्या सत्कार्मी लावला.

आता मात्र कॉटनसिटीचा कॅनवास वाढत चाललाय. कित्येक लोक ह्या चित्र चळवळीशी जोडले जात आहेत. पुढील आंतरराष्ट्रीय कॉटनसिटी चित्रपट महोत्सव जॉर्जिया येथे करण्याचे नियोजन आहे.
कॉटनसिटीच्या ह्या ध्येयवेडया प्रवासास मनापासून शुभेच्छा. – डॉ. महेंद्र रामभाऊ बोरकर

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: