रामटेक – राजु कापसे
अतिशय पुरातन इतिहास असलेल्या रामटेकचा रामायणकाळाशी थेट संंबंंध असल्याचे येथील रामगिरी तपोगीरी, सिंंधुरागिरी टेकडीवरील श्रीराम -जानकी आणि लक्ष्मणाची मंंदिरे सांंगतात. प्रत्यक्ष मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंंद्र यांंनी येथे काही काळ विश्राम केला अन ही भुमी कृृतकृृत्य झाली.
एव्हढेच नव्हे तर शंंबुक मुनीचा वध करण्यासाठी श्रीरामाने पुन्हा एकदा रामगिरीवर आपले चरण ठेवले होते. मंंदिरांंचे आणी तलावांंचे गाव असलेल्या या रामनगरीत टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गणेश मंंदिरात अठराभूजा असलेली वैदर्भीय अष्टविनायक श्री अठराभुजा गणेशाची अतिशय सुरेख मुर्ती आहे. या एकाच मंंदिरात विघ्नहर्त्याची तीन रूपे भाविकांंना पहावयास मिळतात.
शहराच्या मध्यवस्तीत शास्त्री वार्डात गडमंंदिराच्या पायथ्याशी श्रीअठराभुजा गणेशाचे मंंदिर आहे.या मंंदिराची व श्री गणेशाची कथा वैशिष्ट्यपुर्ण आहे.५०० वर्षापेक्षा जास्त प्राचिन इतिहास असलेली व अठराभुजा असलेली ही मुर्ती विदर्भातच नव्हे तर संंपुर्ण महाराष्र्टात एकमेव असावी.
श्री अठराभुजा गणेशाची मुर्ती पांंढर्याशुभ्र स्फटिकाची असुन मुर्तीच्या अठराभुजा स्पष्टपणे दिसतात.या मंंदिराची अशी आख्यायिका आहे की, शैवल्य (तपोगिरी) पर्वतावर श्री अठराभुजा गणेशाचे स्थान आहे. हा शैवल्य पर्वत म्हणजे शंंबुक रूषींंचे आश्रयस्थान .या पर्वतावर विद्याधराची संंस्कृृती हौती.
अठरा विययांंच्या विज्ञानाचे ज्ञान असलेल्या विद्याधराची दृृष्टीच अठराभुजा गणेशात आढळते. साडेचार फुट उंंच पांंढर्या स्फटिकाची ही मूर्ती आहे. या गणेशाच्या सोळा हातात अंंकुश ,पाश,त्रिशुल,परशु, धनुष्य आदि विविध शस्त्रे आहेत. एका हातात मोदक व दुसर्या हातात मारपंंखाची लेखणी आहे. श्री गणेशाची सोंंड वेटोळी आहे.गणेशाच्या डोक्यावर पाच फण्या असलेला नाग असुन गळ्यातही नाग आहे.कमरेला नागपट्टा आहे.
अठरा सिध्दीमुळे गणेशास शास्त्र पुराणात विघ्नेश्वर म्हणून पुजन केले जाते. या मंंदिरात मध्यभागी महागणपतीची तर उजव्या बाजुस रिद्धी-सिद्धी गणेश तर डाव्या बाजुला श्री अठराभुजा गणेश आहेत. या एकाच मंंदिरात श्री गणेशाच्या तीन रूपांंचे दर्शन होऊन भाविक तृृप्त होतात. चांंदरायण कुटुंंबाकडून ह्या मंंदिराची निर्मिती झाली असावी.नागपुरचे हे चांंदरायण कुटुंंब या मंंदिराची व्यवस्था पुर्वी पाहात असे.
आता श्री अठराभुजा गणेश मंंडळाकडे व्यवस्था आहे. मात्र आजही अग्रपुजेचा मान चांंदरायण कुटुंंबाकडेच आहे. श्री अठराभुजा गणेश मंंडळाने या मंंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. मात्र आजपासुन ३० वर्षापुर्वी अगस्ती मुनी आश्रमाचे प्रमूख संंत गोपालबाबा यांंनी या मंंदिराचा पहिल्यांंदा जिर्णोद्धार केला होता.
रामटेकची प्रसिद्ध शोभायात्रेचा शूभारंंभ याच मंंदिरात श्री अठराभुजा गणेशाची पुजा करून केला जातो. हुकुमचंंद बडवाईक, धनराज बघेले, सुमित कोठारी, रितेश चौकसे, रविंंद्र महाजन, गोलु महाजन, अशोक सारंगपुरे आणि इतर सदस्यगण मंंदिरातील उत्सवाच्या आयोजनात व्यस्त आहेत. या अठराभुजा गणेशाची वैदर्भिय अष्टविनायक म्हणून गणना होते. त्याहीपेक्षा एकाच मंंदिरात विघ्नेशाच्या तीन रूपांंचे दर्शन होत असल्याने भाविक मंंदिरात गर्दी करून असतात.