Saturday, January 11, 2025
HomeMarathi News TodayVaibhavi Upadhyaya | 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवीची कार खोल दरीत...

Vaibhavi Upadhyaya | ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवीची कार खोल दरीत कोसळली… अपघातात तिचा मृत्यू…

Vaibhavi Upadhyaya : ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या शोमध्ये चमेलीची भूमिका करणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हीचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. चंदिगड येथील तीचे कुटुंबीय पार्थिव मुंबईत आणत आहेत. वैभवी यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

साराभाई व्हर्सेस साराभाई टेक 2 या शोमध्ये वैभवीसोबत काम करणारे निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांनी या बातमीला दुजोरा दिला. वळण घेत असताना उपाध्याय यांची कार दरीत पडल्याचे त्यांनी उघड केले. त्यांनी सांगितले की, वैभवीचा मंगेतरही कारमध्ये होता, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

वैभवी 2020 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत ‘छपाक’ आणि ‘तिमिर’ (2023) या चित्रपटांमध्ये दिसली होती. गुजराती थिएटर सर्किटमध्ये ही अभिनेत्री लोकप्रिय नाव होती. टीव्ही शो ‘साराभाई वर्सेस साराभाई’ व्यतिरिक्त, उपाध्याय हिने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या डिजिटल मालिकेतही काम केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: