Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingलसीकरण हा मोठा घोटाळा…त्यामुळे करोडो लोकांचा मृत्यू…बाबा रामदेव यांनी उडवून दिली खळबळ...

लसीकरण हा मोठा घोटाळा…त्यामुळे करोडो लोकांचा मृत्यू…बाबा रामदेव यांनी उडवून दिली खळबळ…

योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोना लसीकरणाबाबत दिलेले एक विधान खूप वेगाने व्हायरल होत आहे. या वक्तव्यात बाबा लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याला देशातील मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर यामुळे करोडो लोकांचा मृत्यू झाल्याचे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे. वास्तविक बाबांचा एका टीव्ही चॅनलवर कार्यक्रम सुरू होता, त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

बाबा रामदेव म्हणाले, “हे लसीकरण मोठा घोटाळा आहे. लसीकरणामुळे लाखो, करोडो लोकांचा मृत्यू झाला आहे. जेवढे लोक कोरोनाने मृत्यू झाले नसतील त्यापेक्षा कोरोनाच्या लसीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू जास्त झाले आहे. लग्नात कुणी हार घालताना आणि खाली पडून मेला. त्या व्यक्तीला कोणताही आजार नसताना, हृदयात कोणताही अडथळा नव्हता किंवा इतर काही नव्हते. कोणी स्विमिंग पूलवर गेले आणि नंतर परतलेच नाही, धावताना खेळाडू आणि सैनिकांचा मृत्यू झाला.

लसीकरणानंतर अनेकांना सुगर झाली. त्याचबरोबर अनेकांचे डोळे गेले. लसीकरणानंतर पैरालिसिस झाला आहे, पांढरे डाग आले आहेत, ज्यांचे यकृत, किडनी निकामी झाली आहे, त्यांना कर्करोग पुन्हा झाला आहे. त्याचवेळी बाबांनी सांगितले की, ज्यांचे यकृत आणि किडनी त्यांनी बरे केले आहे, त्यांचे यकृत आणि किडनी लसीकरणानंतर पुन्हा खराब झाली आहे. लसीकरण हा एक मोठा उपद्रव आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: