सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांचे मोठं वर्चस्व या अधिवेशनात दिसत आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांची विरोधकांनी चांगलीच दमछाक केली आहे. आता तर आमदार अमोल मिटकरी यांनी Twitter ला video शेयर करत चांगलीच खळबळ उडवून दिली. त्यांनी आमदार निवासामधील आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा कसा वापर केला जातो आहे असे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना त्यांना सरकारवर टीका करत कंत्राटदारावरही टीका केली आहे.
तेही त्यातून त्यांनी दाखवले आहे. अमोल मिटकरी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे.त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की, हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह.
हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच त्यांनी कोट्यवधींचे टेंडर देऊनही अशी चुकीच्या पद्धतीने आमदारांच्या जेवण आणि चहापाण्याची व्यवस्थी केली जाते असंही त्यांनी त्या व्हिडीओमधून दाखवले आहे.
व्हिडीओमध्ये वेटर टॉयलेटमधील पाण्याचा वापर करून आमदारांसाठी असेल्या कपबश्या धूत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
तर आझादी का अमृत महोत्सव असा हॅशटॅग वापरून त्यांनी स्वातंत्र्य भारतातील व्यवस्थेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था हा वाद वाढणार असल्याचे दिसून येत आहे.