महेंद्र गायकवाड, नांदेड
नांदेड जिल्ह्यात यावर्षी सुरूवातीपासून झालेल्या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस,मूग, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात पाच ते सहा वेळेस ढगफुटी झालेली आहे.
सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती त्यामुळे नदीकाठी सखल भागातील सर्व पिके नष्ट झाली आहेत शेतकऱ्यावर कोसळलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे मोठ्या अडचणीत सापडला आहे.
तरी राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ एकरी 25 हजार रुपयांची मदत करावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय प्रहार युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी शामराव पावडे यांनी राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.