UPSC Chairman Resign : राज्यात IAS पूजा खेडकर प्रकरण सुरु असतानाच UPSC अध्यक्षांने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे…पूजा खेडकर प्रकरणात UPSC अध्यक्षांचा काही सहभाग तर नाही न अशी शंका व्यक्त होत आहे…UPSC अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत होता मात्र त्याआधीच राजीनामा दिल्याने विविध चर्चेला उधान आले आहे….
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मनोज सोनी यांनी राजीनामा पत्र राष्ट्रपतींना पाठवले. जूनमध्येच त्यांनी यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जाणून घेऊया मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पद का सोडले?
मनोज सोनी 2017 मध्ये UPSC मध्ये सदस्य म्हणून रुजू झाले. 16 मे 2023 रोजी त्यांना UPSC चे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता, परंतु त्यांनी पाच वर्षे अगोदर आपल्या पदाचा राजीनामा दिला. पूजा खेडकरच्या वादात त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच UPSC अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांना गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा अनुपम मिशनमध्ये सहभागी व्हायचे आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, मनोज सोनी यांच्या राजीनाम्याचे कारण आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे मनोज सोनी वयाच्या ४० व्या वर्षी कुलगुरू बनले. 2005 मध्ये मोदींनी त्यांना वडोदराच्या एमएस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनवले. UPSC मध्ये येण्यापूर्वी मनोज सोनी गुजरातच्या दोन विद्यापीठांमध्ये तीनदा कुलगुरू बनले होते….