Monday, December 23, 2024
Homeराजकीयआगामी ग्रा.पं. निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाची आढावा बैठक...

आगामी ग्रा.पं. निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाची आढावा बैठक…

रामटेक – राजू कापसे

दिनांक २५ नोव्हेंबर रोज शुक्रवारला शहरातील फिशरमन सोसायटीच्या सभागृहात तालुक्यातील होऊ घातलेल्या 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली.सदर आढावा बैठक श्री. चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती.

दरम्यान यावेळी संघटन मजबुत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी गावागावातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन आपले विचार तथा नियोजन व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचेसह सौ. अस्मिता मुन्ना बिरणवार (सदस्या पं.स. रामटेक) व रामटेक शहर काँग्रेस कमिटीचे युवा नेते श्री. पी.टी. रघुवंशी तथा तालुक्यातील ग्रामपंचायतचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: