Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीकरनुर येथील ओढा ओलांडताना युपी च्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू...

करनुर येथील ओढा ओलांडताना युपी च्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू…

कागल – राहुल मेस्त्री

करनुर ता.कागल येथील ओढा ओलांडताना उत्तर प्रदेश मधील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.15 रोजी दुपारी चारच्या दरम्यान घडली असुन मुकेश राजेश शर्मा असे त्या मृत तरुणाचे नाव आहे . याबाबतची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाक्याजवळ शनिवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास दोन वाहनांत अपघात झाला होता. यावेळी जमाव मारहान करतील या भीतीपोटी इथून मुकेश राजेश शर्मा या तरुणांने पळ काढून करनुर ता.कागल या दिशेने गेला.येथील मराठी शाळे नजिकहुन ओढा ओलांडून पुन्हा महामार्गावर जाण्याच्या नादात ओढा ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बुडाला. ही बातमी स्थानिकांना समजल्यावर त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचाराकरिता कागल ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: