Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीभाजप नेते अनुज चौधरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या!…हत्येचा व्हिडिओ आला समोर...

भाजप नेते अनुज चौधरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या!…हत्येचा व्हिडिओ आला समोर…

न्युज डेस्क : उत्तर प्रदेशातील भाजप किसान मोर्चाचे नेते अनुज चौधरी यांची गुरुवारी संध्याकाळी मुरादाबादच्या माझोला पोलीस स्टेशन परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनुज चौधरी त्याचा लहान भाऊ पुनीतसोबत जाताना दिसत आहे. मागून तीन जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी अनुज चौधरीवर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने अनुज चौधरी रस्त्यावर पडले. ते पडल्यानंतर, हल्लेखोर बाईकवरून उतरतात आणि नंतर गोळीबार करतात.

अनुज चौधरी हे संभल जिल्ह्यातील रहिवासी होते. सध्या तो मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पार्श्वनाथ प्रतिभा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक-402 मध्ये राहत होते. 2021 मध्ये, अनुज चौधरी यांनी संभल जिल्ह्यातील असमोली ब्लॉकमधून ब्लॉक प्रमुख निवडणूक लढवली. यावरून अनुजचे काही लोकांशी वैर होते. अनुज लवकरच ब्लॉक प्रमुखाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार होते, पण त्याआधीच त्याची हत्या झाली.

दुसरीकडे, एसएसपी हेमराज मीणा यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर लवकरच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचे सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी हत्येतील आरोपींचा शोध सुरू केला आहे. मृत अनुज चौधरीच्या कुटुंबीयांनी हत्येप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबीयांनी अनिकेत चौधरी आणि अन्य एकावर एफआयआर दाखल केला आहे. आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत

पोलिसांच्या 5 पथकांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला
एसएसपी हेमराज मीणा यांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पाच टीम तयार केल्या आहेत. अनुज चौधरी हे देखील किसान युनियनशी संबंधित होते. त्यामुळे शेतकरी संघटनेचे लोक मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचले. यादरम्यान, कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून एसएसपींनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: