Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayसेवा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड...

सेवा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड…

जलालखेडा येथील सेवा सहकारी संस्था बिनविरोध…

अध्यक्ष पदी सेवक माकोडे तर उपाध्यक्ष पदी घनश्याम रेवतकर यांची निवड….

अध्यक्ष कुणाचा राष्ट्रवादीचा की बीजेपीचा ?…

दीपक चौधरी यांच्या पुढाकाराने सेवक माकोडे अध्यक्ष पदी…

नरखेड (ता.22)

नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवारी नरखेड येथे पार पडली असून यात अध्यक्ष पदी सेवक माकोडे तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादिच्या घनश्याम रेवतकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले सेवक माकोडे पंचायत समितीच्या निवडणुकिमध्ये जलालखेडा सर्कल मधून बीजेपी पक्षाचे तिकीट घेत निवडणूक लढले होते. त्यात त्यांचा पराभव झाला होता. सेवा सहकारी पथ संस्थेचा अध्यक्ष बीजेपीचा असल्याचा दावा बीजेपी चे कार्यकर्ते करत आहे तर राष्ट्रवादी चे कार्यकर्ते अध्यक्ष राष्ट्रवादीचा असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे नेमका अध्यक्ष कोणाचं असा संभ्रम निर्माण झाला आहे. सेवक माकोडे यांची अध्यक्षपदी वर्णी राष्ट्रवादिचे नेते दीपक चौधरी यांच्या पुढाकाराने झाली. सेवा सहकारी पथ संस्थेच्या सदस्य पदी सुधीर खडसे, योगेश त्रिपाठी, बाळाजी खोपे, दिवाकर पेठे, सुशीला राऊत, सदाशिव ठोंबरे, जानकी चरपे, मोतीराम भालसागर, बाबा कन्हेरे, पद्माकर वरुडकर, मोतीराम आगरकर यांची सुध्दा बिनविरोध निवड झाली आहे . अध्यक्ष पदाची निवडणूक जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश आरघोडे, दीपक चौधरी, अधीर चौधरी, नारायन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे यावेळी स्वागत करण्यात आले असून यावेळी माजी उपसरपंच देवेंद्र निमजे महादेव चौरे, शबा बानवा, प्रफुल डांगरे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: