राज्यातील विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड निकाल लागला ज्यात काँग्रेसने कसबा जागा जिंकली आहे. तर चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. राज्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला नसला तरी नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या आहेत. त्याच बरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या RPI पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. ही कमाल त्यांनी स्वबळावर केली असल्याचे RPI (A) परतीचे प्रवक्ता हेमंत रणपिसे यांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष आरपीआयने नागालँडमध्ये दोन जागा जिंकल्या असल्याने या पक्षाने कमालच केली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारण राज्यात त्यांना एकही जागा जिंकता आली नसली तरी परराज्यात ही किमया घडवून आणल्याने आठवले गटाचे कौतुक होत आहे. सोबतच त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली आणि दोन जागा जिंकल्या. रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आरपीआयने एका राज्यात विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या आहेत. रणपिसे म्हणाले की, यावेळी आम्ही आठ जागांवर निवडणूक लढवली. तीन जागांवर आमचा काही मतांनी पराभव झाला. ऊस उत्पादक शेतकरी हे निवडणूक चिन्ह आम्हाला मिळाले.
आरपीआयचे उमेदवार इम्तिचोबा हे तुएनसँड सदर-२ मधून विजयी झाले आहेत, तर नोक्सेन विधानसभेतून वाय. लिमा ओनेन चांग यांनी बाजी मारली आहे. हा मोठा विजय साजरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्वतः आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात उपस्थित होते.RPI