या जुन्या निवेदनाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला व त्या संदर्भात चर्चा सुद्धा डॉ राजेश ठाकरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांचे द्वारे मुंबई विधान भवन येथे करण्यात आली.
रामटेक – राजु कापसे
रामटेक पारशिवनी टुरिझम हब व्हावे व, रामटेक व पारशिवनी पर्यटन क्षेत्रात पर्यटकांची संख्या लाखांच्या. घरात व्हावे या करिता रामटेक पारशिवनी क्षेत्रात रेल्वे नेटवर्क येणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता गेल्या दीड वर्षापासून खालील मागण्यांकरिता सतत पाठपुरावा सुरू आहे.
डॉ राजेश ठाकरे यांचे रामटेक पारशिवनी परिसरात रेल्वे नेटवर्क संदर्भात जुने पत्रव्यवहार व संबंधित मागण्या….
- रामटेक पारशिवनी परिसरात रेल्वे नेटवर्क यावे याकरिता ट्रेन रिपेरिंग वर्कशॉप तसेच ट्रेन वॉशिंग सेंटर या परिसरात देण्यात यावे
- रामटेक -पारशिवनी- मध्य प्रदेश. रेल्वे चालू करणे.
- रामटेक- देवलापार -मध्य प्रदेश. रेल्वे चालू करणे.
- रामटेक -तुमसर – छत्तीसगड रेल्वे सेवा सुरू करणे