रामटेक – राजू कापसे
ज्ञानदिप कॉन्वेंट व फार्मसी कॉलेज रामटेकला नुकतीच केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांनी भेट दिली. भेट दिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले व म्हणाले की ग्रामिण भागात ज्ञानदिप कॉन्वेंट व फार्मसी कॉलेजची भव्य इमारत, आदिवासी मुलामुली करीता निवासी व्यवस्था, या पायभूत सुविधा आहेत.
तसेच फार्मसी कॉलेज स्थापन केल्याने येथील परिसरातील मुलांना व्यावसायीक शिक्षण मिळन्यास सुरुवात झाली व विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहतील असे ते म्हणाले. या वेळी आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार डी.एम. रेड्डी सहित विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष गजेंद्रकुमार चौकसे व उपाध्यक्ष अनिता जयस्वाल यानी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गडकरीचे स्वागत केले. यावेळी सचिव केवल हटवार, डॉ. एम. एस. कुरेशी, धनराज काठोके. एड. अरुण देवळे, डॉ. अब्दुल गणी, यशवंत सहारे, कमलेश टक्कामोरे, मनोहर राघोर्ते , प्रकाश चौक, सीईवो गीता भास्कर, प्राचार्य सुरेश भोयर उपस्थित होते