Sunday, November 17, 2024
Homeराज्यश्री गाडगे महाराज विद्यालय येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न...

श्री गाडगे महाराज विद्यालय येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न…

माजी आमदार सहकार महर्षी ॲड भैय्यासाहेब तिडके यांच्या ७७ व्या वाढदिवसा निमित्त ७७ गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप…

मुर्तिजापूर – श्री. गाडगे महाराज विद्यालय मंडळाचे अध्यक्ष , माजी आमदार , सहकार महर्षी आदरणीय ॲड. भैय्यासाहेब तिडके यांच्या ७७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील ७७ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शालेय साहित्याचा वाटप करण्यात आला.

याकरिता तिष्णगत मल्टीपर्पज सोसायटी शाखा मूर्तिजापूर एड अविन अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम रा. काँ. ओबीसी सेल महिला तालुकाध्यक्ष रंजना सदार शहराध्यक्ष पुनम मारकड विशाल शिरभाते यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्रामुख्याने संस्थेचे सचिव शिरीष तिडके रा काँ प्र उपाध्यक्ष.प्रा.विश्वनाथ कांबळे प्र संसचिव रवि राठी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घानीवाला तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी शाखा मूर्तिजापूरचेअनिल डायलकर मिलिंद इंगळे जि प सदस्य सम्राट डोंगरदिवे मा उपनगराध्यक्ष सुनील पवार निळूबाप्पू देशमुख रा का महिला अध्यक्ष सविता अडसड ओबीसी सेल महिला तालुकाअध्यक्ष रंजना सदार शहर अध्यक्ष दिपाली देशमुख ओबीसी सेल शहरअध्यक्ष पुनम मारकड विशाल शिरभाते निखिल ठाकरे रवि मारकड आनंद पवार अमोल शिंदे अतुल गावंडे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
विद्यालयातील होतकरू, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्त्याचे वाटप संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैय्यासाहेब तिडके यांचे हस्ते करण्यात आले.

विद्यालयाचे वतीने साहेबांचे स्वागत व सत्कार प्रभारी प्राचार्य श्री. श्याम कोल्हाळे सर यांनी केला यानंतर मा. साहेबांनी केक कापून व विद्यार्थ्यांना चॉकलेट चे वाटप करून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री जयस्वाल सर व आभार प्रदर्शन प्रा.अनासने सर यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: