Sunday, December 22, 2024
Homeराज्यप्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत निकृष्ट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका -...

प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत निकृष्ट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका – डॉ. राजेश ठाकरे…

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- राष्ट्रीय महामार्ग नागपूर जबलपूर रोडवरील मनसर कांदरी वस्ती ते भिलवाडा रामटेक जाणारा रस्ता हायवेच्या सर्विस रोडच्या कडेला तीन तीन फुटाचे गट्टे पडलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रस्ता बांधकामात भ्रष्टाचार झालेला असून सदर रस्त्याच्या सुरुवातीला प्रधानमंत्री सडक योजना अंतर्गत आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे सदर काम झाल्याचे गावकऱ्यांच्या म्हणण्यावरून निदर्शनास येत आहे.

तेव्हा सदर रस्ता मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच स्थानिक आमदारांनी व इतर लोकप्रतिनिधींनी सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे तसेच नॅशनल हायवे टोल वसूल करणारे ओरिएंटल कंपनी यांनी सुद्धा सदर हायवे ला जोडून जाणारे रस्ते याची चौकशी आवर्जून केली पाहिजे त्यांच्या हत्यारित असेल तर त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्ती काम केले पाहिजे किंवा सदर संबंधित एजन्सीला सूचित सुद्धा केला पाहिजे सदर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू मुरूमची ओरलोटे ट्रकची वाहतूक रोजची शेकडे होत आहे.

त्यामुळे सुद्धा या रस्त्यावर नवीन बांधकामाचा वाटोळ झालेला आहे तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी केली पाहिजे व दोषींवर कारवाई करून शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या हितार्थ पक्क बांधकाम दर्जेदार बांधकामाचा रस्ता त्या ठिकाणी लवकरात लवकर तयार झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी गावकऱ्यांची आहे सदर भ्रष्टाचार ग्रस्त रस्त्याची मोका चौकशी करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश ठाकरे तसेच अनिकेत कराडे जिल्हा समन्वयक भाजपा ग्रामविकास पंचायतराज सह इतर स्थानिक नागरिक या ठिकाणी मोका चौकशीत  उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: