पिक नुकसानीच्या तुलनेत विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक…
शेगांव – पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी वितरीत केलेली रक्कम, व विम्यापासुन वंचित असलेल्यां शेतकऱ्यांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करून शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत १००% नुकसानभरपाई द्या. अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी केली यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते..