Thursday, September 19, 2024
Homeराज्यशिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे गट,...

शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी या पक्षातून माजी तालुका प्रमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…

सांगली – ज्योती मोरे

शासकीय विश्रामगृह येथे उबाठा गटाची माजी तालुकाप्रमुख उमाकांत कार्वेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना ते म्हणाले आम्ही हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे राज्याची कार्यशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात काम करणार आहे.

आम्ही दुसऱ्या पक्षात नाही तर आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शेवटपर्यंत शिवसैनिकच राहणार.. सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यावेळी बोलताना म्हणाले शिवसेना हे आपले कुटुंब असून या कुटुंबात तुमचे स्वागत आहे. आपण शंभर टक्के समाजकारण करून आपले पक्ष पुढे नेऊ महाराष्ट्र सरकारचे शासन आपल्या दारी हे कार्यक्रम लवकर सांगली जिल्ह्यात घेऊन नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देऊ.

पक्ष प्रवेश झालेले पदाधिकारी – उबाठा गटाचे उमाकांत कर्वेकर माजी तालुका प्रमुख, प्रदीप बर्गे सहकार जिल्हा प्रमुख मनसे, मनोज जाधव, सुभाष सरगर, विनोद कोटकर, शीतल दाईगडे, रामदास मुळीक सर्व उबाठा गट यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर निळकंठ,

तासगाव तालुका प्रमुख संजय (दाजी) चव्हाण, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग, सांगली प्रमुख संदीप ताटे, मिरज शहर प्रमुख किरणसिंग रजपूत, कुपवाड शहर प्रमुख अमोल पाटील सुरज कासलीकर, मिरज शहर संघटक गजानन मोरे,

सांगली शहर संघटक धर्मेंद्र कोळी,सारंग पवार, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे, आकाश माने महिला जिल्हा संघटिका रुक्मिणी आंबिगिरे, उपजिल्हा संघटिका अंजली खांडेकर, शहर प्रमुख राणी कमलाकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: