Monday, December 23, 2024
Homeराज्यपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये परत एनडीएचे सरकार येणार असून...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये परत एनडीएचे सरकार येणार असून त्या विजयात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार – खासदार प्रफुलभाई पटेल…

राज्यसभेसाठी खासदार प्रफुलभाई पटेलांनी उमेदवारी अर्ज केला दाखल…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

आमची महायुती एकदम घट्ट असून चांगले काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये परत एनडीएचे सरकार येणार आणि ४०० पार टप्पा गाठणार असल्याचा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्रात अनेक चुकीचे व दिशाभूल करणारे सर्व्हे येत आहेत तरीही आम्ही महाराष्ट्रात ४५ जागा महायुतीच्या माध्यमातून जिंकणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार असल्याची खात्री प्रफुल पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार प्रफुल पटेल यांनी विधानभवनातील निवडणूक कार्यालयात आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते मुकेश गांधी आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज खासदार म्हणून टर्म सुरू असताना दाखल केला आहे. त्यामुळे काही लोक तर्कवितर्क लावत आहेत. मात्र काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या. आम्ही राजकीय जीवनात काम करत असताना काहीना काही घडामोडी कराव्या लागतात. त्यामुळे येणारा काळ तुम्हाला आम्ही आज अर्ज का दाखल केला आहे हे स्पष्ट करेल असेही प्रफुल पटेल म्हणाले.

मला खात्री आहे की निवडणूक बिनविरोध होणार आहे. आमची रिक्त जागा आमच्याकडेच राहणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट दिसेल असेही प्रफुल पटेल यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: