Thursday, September 19, 2024
Homeराज्यहर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सहा लाख वीस हजार झेंड्यांची गरज पूर्ण...

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सहा लाख वीस हजार झेंड्यांची गरज पूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती…

सांगली प्रतिनिधी– ज्योती मोरे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर आणि आस्थापनांवर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकविण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक खेड्यापाड्यातील प्रत्येक घरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात येणार असून, हे राष्ट्रध्वज वेगवेगळ्या संस्था, संघटना ,कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, बँका यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या घरावर झेंडा फडकावून हा उपक्रमा यशस्वी करावा. असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी डूडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: