बाळापुर – सुधीर कांबेकर
शासनाच्या महसूल पंधरवाडा अंतर्गत दिनांक एक पासून शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी असलेल्या विविध शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी तसेच विविध मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय अधिकारी बक्षी साहेब तहसीलदार वैभव फरतारे यांच्या मार्गदर्शनाखाली करून महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
या अंतर्गतच व्याळा मंडळ मधील रिधोरा येथे ई पीक पाहणी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले ई पी पाहणीचे महत्त्व सांगून विवीध माहिती देण्यात आली याप्रसंगी उपविभागीय अधिकारी बक्षी साहेब, तहसीलदार वैभव फरतारे, नायब तहसीलदार सागर भागवत नायब तहसीलदार पांडे, नायब तहसीलदार, सैयद साहेब नायब तहसीलदार सुरडकर साहेब उपस्थित होते.
यानंतर दि 7ला युवा संवाद, दिनांक 8 ला महसूल जन संवाद ,दिनांक 9 ला महसूल इ प्रणाली, दिनांक 10लासैनिक हो तुमच्यासाठी ,दिनांक 12 ला एक हात मदतीचा दिव्यांकांच्या कल्याणा करिता ,दिनांक 13 ला महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, दि 14 ला महसूल पंधरवाडा वार्तालाप, दिनांक 15 ला कर्मचारी पुरस्कार वितरण व सांगता समारंभ हे कार्यक्रम बाळापूर तहसील अंतर्गत होणार असून याचा लाभ जनतेनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार वैभव फरतारे यांनी केले कार्यक्रम यशस्वीेसाठी करिता मंडळ अधिकारी, तलाठी, सर्व कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत.