Sunday, November 17, 2024
Homeराज्यजलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत देखभाल व दुरुस्ती करीता प्राथमिक कृषी सेवा सहकार संस्था...

जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत देखभाल व दुरुस्ती करीता प्राथमिक कृषी सेवा सहकार संस्था होणार निवड…

अकोला – संतोषकुमार गवई

सहकार से समृध्दी हे स्वप्न साकार करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयांतर्गत् मा. केद्रीय गृह आणि सहकार मंत्री यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबविले जात आहेत. भारत सरकार मध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्था च्या तळागाळातील समुदायाच्या संपर्काचा विचार करुन राष्ट्रीय जल जिवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाइपलाईनव्दारे पाणीपुरवठा योजनांचे देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था ला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जल जीवन मिशन, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयास जिल्हयातील ग्रामीण भागात पाइप लाईनव्दारे पाणीपुरवठा योजनांचे देखभाल आणि दुरुस्ती करण्याकरिता या जिल्हयातील ग्रामस्तरीय इच्छुक सात प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्थाची नावे प्रायोजीत तत्वा वर कळविण्याबाबत सुचित केले आहे.

ज्या संस्थेस सदर योजनेअंतर्गत काम करावयाचे आहे. त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला व मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवा सोसायटयांचा संघ मर्या अकोला यांचे कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन डॉ. प्रविण एच लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांनी केले आहे.

अकोला जिल्हयामध्ये एकुण ४१२ प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्था नोंदणीकृत असुन त्यापैकी दि.३१.३.२०२४ अखेर १३१ संस्था नफयामध्ये आहेत. तसेच केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण या प्रकल्पा अंतर्गत अकोला जिल्हयातील ४१२ संस्थाची निवड करण्यात आली असुन केद्र शासनाने दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजीच्या पत्रान्वये प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या आदर्श उपविधीमध्ये नविन १५१ विविध व्यवसायाचा अंतर्भाव आहे.

त्याअंतर्गत १) कॉमन सर्व्हस सेंटर २) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केद्र ३) धान्य भांडार व प्रकिया उदयोग ४) पी.एम. कुसुम योजना ५) प्रधानमंत्री किसान समृध्दी ६) शेतकरी उत्पादक गट (FPO) स्थापन करणे ७) प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांमार्फत ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांचे देखभाल व दुरूस्ती करणेबाबत इत्यादी व्यवसायाचे प्राधान्याने कामकाज सुरु आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण या प्रकल्प योजनेअंतर्गत अकोला जिल्हयातील निवड केलेल्या ४१२ संस्थापैकी ३४८ संस्थाना संगणक, प्रिंटर, बॅटरी व युपीएस प्राप्त झाले असुन डाटा भरणा करण्याचे कामकाज सुरु असुन लवकरच संपुर्ण संस्था हया संगणीकरण होवुन संस्थेच्या सभासदांना वेळीच खातेउतारा तसेच इतर माहिती प्राप्त करता येईल.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: