नांदेड – महेंद्र गायकवाड
जिल्ह्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्हातील अवैद्य शस्त्राचा साठा विक्री करणारे लोकांविरुध्द कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिसांना दिल्या होत्या.
त्यानुसार दिनांक 18 मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सपोनी आर.डी. वटाणे, सोबत पोलीस अंमलदार पोहेकॉ विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम, मेघराज पुरी, शेख इम्राण, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार,
महीला पोलीस शुभांगी कोरेगावे, अर्चना लांडगे तसेच डीवीजन डी. बी. मधील पोलीस अंमलदार, चंद्रकांत स्वामी, श्रीराम दासरे, यांनी पोलीस ठाणे वजिराबाद हद्यीतील गुरुद्वारा गेट नंबर 01 व नगीनाघाट परीसर मधे असलेल्या एकुण तिन दुकानावर छापे मारले.
सदर छापा कारवाई मध्ये धारदर व घातक स्वरुपाचे 49 तलवारी, 94 खंजर, 07 गुप्ती व 02 बिचवा असा एकुण 1,23,400/- रुपयाच्या मुद्देमाल जप्त केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयातील एक आरोपीस अटक करण्यात आले आहे.
सरद प्रकरणी सरकारतर्फे सपोनि आर.डी. वटाणे, व विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन गुरन 135/2024 कलम 4/25,7/25 शस्त्र अधिनियम, गुरन 136/2024 कलम 4/25,7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले सदर गुन्हयाचा तपास चालु आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.