कोल्हापूर – राजेद्र ढाले
उंचगाव येथील कु.आरती ज्ञानोबा पाटील हिची जपान (टोकियो) येथे दि. १ डिसेंबर ते ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत निवड झाली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव पॅरा बॅडमिंटनपट्टू आहे. त्यामुळे उंचगावच्या आरती पाटीलने कोल्हापूरचा झेंडा अटकेपार रोवला आहे.
आरती ही जन्मजात एका हाताने दिव्यांग आहे. तसेच तिची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही तिने आजवर विविध खेळात जिल्हा स्तर, राज्यस्तर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आजपर्यंत तिच्या नावावर एकूण २१ सुवर्णपदक, ९ कांस्यपदक, १० रौप्यपदके व अन्य पुरस्कार तिने प्राप्त केले आहेत. व यापुढेही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्याचा मानस तिने व्यक्त केला.
आरती पाटील हिच्या कामगिरीबद्दल व तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी करवीर शिवसेनेच्या वतीने फेटा बांधून तसेच भगवी शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना आरती पाटील चे अभिनंदन केले.यावेळी आरती पाटीलचे आई वडीलही उपस्थित होते.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, मा. उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, युवासेना उपजिल्हाधिकारी विनायक जाधव, विभागप्रमुख दीपक रेडेकर, हिंदुत्ववादी शरद माळी, फेरीवाले संघटनेचे उपतालुकप्रमुख बाळासाहेब नलवडे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी,योगेश लोहार, सचिन नागटीळक, प्रफुल्ल घोरपडे, विराग करी, अरविंद शिंदे, आबा जाधव, विजय गुळवे, दत्तात्रय विभूते, सुनील चौगुले आदी उपस्थित होते