Sunday, December 22, 2024
Homeराज्यशेतातील सागवन वृक्षाची विनापरवानगी वृक्षतोड, बनावट हॅंबरचा वावर...

शेतातील सागवन वृक्षाची विनापरवानगी वृक्षतोड, बनावट हॅंबरचा वावर…

रामटेक – राजु कापसे

शेतातील सागवन वृक्ष कंत्राटदाराने वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता तोडली. तसेच त्यावर बनावट हॅंबर मारून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. ही घटना वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवणीच्या कक्षेतील डोरली येथे शनिवारी दुपारी घडली . वनअधिकार्‍यांनी तीन आरोपीना सोमवारी अटक केली.

शेतकरी अविनाश निकोसे (डोरली , तालुका पारशिवणी),मध्यस्थी आकाश विठ्ठल पाटील ( हिंगणा बारभाई ), कंत्राटदार नितेश हरिभाऊ सातपुते ( नागपूर) यांना वनविभागाने अटक केली. मौजा डोरली येथील सर्व्हे नंबर १५० ,पटवारी हलका नंबर १२ ही अविनाश निकोसे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात सागवनची झाडे होती. आर्थिक कारणास्तव त्यांनी ती झाडे विकण्याचा निर्णय घेतला . याकरिता आकाश पाटील याने मध्यस्ती केली. त्याने नितेश सातपुते याला ती झाडे दाखवली.

नितेशने पेट्रोल हात आरायंत्र द्वारे ती झाडे तोडली. याकरिता त्याने वनविभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच त्याने ती झाडे शासकीय नियमानुसार तोडण्यात आली असे भासविण्याकरिता बनावटी पासिंग हॅंबर मारले.

नियमित गस्त घालीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना डोरली शिवारातील शेतात सागवन वृक्ष कापलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी सखोल तपासणी केली असता त्यांना ती अवैध वृक्षतोड आढळली. त्यावरील हॅंबर देखील बनावट होते. तसेच सागवन नगावर गोलाई व लांबी लिहिली होती.

त्यांनी तात्काळ २ लक्ष ५० हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. सोमवारी रात्री वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ चे कलम ३ व ४ ,तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ कलम (६३) १ व २ नुसार आरोपी अविनाश निकोसे, आकाश विठ्ठल पाटील, कंत्राटदार नितेश हरिभाऊ सातपुते यांना अटक केली.

ही कार्यवाही उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा, सहायक वनसंरक्षक हरविर सिंग यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत , क्षेत्र सहायक एच. एम. वाढई, पी. बी. पिल्लारे, जे .बी. चौरे, इन एम नगरारे , स्वप्नील डोंगरे ,पी एस वाहने ,यु. एस. बावणे यांच्या पथकाने केली .

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: