Monday, December 23, 2024
Homeराज्यउमेश अलोणे यांचा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव...

उमेश अलोणे यांचा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव…

आज मराठी पत्रकार दिनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारितेतील योगदानाबद्दल ‘एबीपी माझा’चे अकोला जिल्हा प्रतिनिधी उमेश अलोणे यांना ‘राज्यस्तरीय चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, मंत्रालयातील सचिव नंदकुमार साहेब, उद्योजक अभिजीत पाटील, चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यक्रमाचे आयोजक, औरंगाबाद येथील ‘अप्रतिम मीडिया’चे संस्थापक डॉ. अनिल फळे, विवेक देशपांडे, रणजीत कक्कड उपस्थित होतेय.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: